July 20, 2024 9:27 AM July 20, 2024 9:27 AM

views 14

शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणं महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद -मुख्यमंत्री

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोन्याचं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचं, वीरतेचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमा अंतर्गत शिवरायांची वाघनखं, समारंभपूर्वक प्रदर्शित करण्यात आली; तसंच अन्य शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमं...