April 18, 2025 9:46 AM April 18, 2025 9:46 AM

views 10

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको परिसरातील कॅनॉट उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. तसंच आपल्या दौऱ्यात ते उद्योजकांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर संरक्षणमंत्री लखनौला रवाना होणार आहेत.

February 20, 2025 9:03 PM February 20, 2025 9:03 PM

views 14

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात परिचारिकांचं कामबंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पदोन्नतीसह, परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयात परिसेविका पद पुनर्जीवित करणं, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणं, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणं, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळणं, यासह इतर मागण्यांचं निवदेन परिचारिका संघटनेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलं.

January 21, 2025 8:45 AM January 21, 2025 8:45 AM

views 11

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट यांनी, येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं...   पोलीस, कलेक्टर आणि ग्रामीण एसपी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ...

January 13, 2025 10:31 AM January 13, 2025 10:31 AM

views 10

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांध्ये राबवण्यात येतोय स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल उपक्रम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये सध्या १७ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘‘या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था, स्मार्ट क्लासरूम, सिंथेटिक टर्फ सह क्रीडांगण, आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली, तर विद्यार्थ...

January 10, 2025 9:15 AM January 10, 2025 9:15 AM

views 3

कन्या भ्रूण हत्येच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी पुढे यावं – छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्ह्यात फिरत्या वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती वावरत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं असून, त्याबाबत कडक उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना यासंबंधी काही माहिती मिळाली तर १८ ०० २३३ ४४ ७५ या नि:शुल्क क्रमांकावर माहिती द...

November 15, 2024 2:29 PM November 15, 2024 2:29 PM

views 18

महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

विधानसभेची यंदाची राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे. महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं.   औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे. मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता, असं ते म्हणाले. चिखलठाणा विमानतळाला अजून संभाजी महाराजांचं नाव का दिलं नाही, असा सवाल त्यांनी केला.

November 6, 2024 10:17 AM November 6, 2024 10:17 AM

views 10

केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा घेणार आढावा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाच वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेतला जाईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.

October 18, 2024 8:46 AM October 18, 2024 8:46 AM

views 9

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघानं तर मुलींच्या गटात मुंबई संघानं विजेतेपद पटकावलं आहे. यजमान लातूर विभागाच्या दोन्ही संघास उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.  

October 13, 2024 7:19 PM October 13, 2024 7:19 PM

views 9

प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार – मंत्री किरेन रिजीजू

भारतीय संविधानाला  येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रिजीजू यांनी केलं.

August 13, 2024 9:01 AM August 13, 2024 9:01 AM

views 14

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता महाअभियान

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून १५ ऑगस्ट पर्यंत शहरात स्वच्छता महाअभियान राबवलं जात आहे. या महाअभियानात विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. काल जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेसह, नवखंडा महिला महाविद्यालय तसंच BSGM शाळेतर्फे आपापल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छताफेरी काढण्यात आली.