November 8, 2024 8:20 PM November 8, 2024 8:20 PM

views 15

बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या

नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी  १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी यंदा गेल्या वर्षीपेक्षा ७० अधिक  गाड्यांची सोय करण्यात आली असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.  

October 20, 2024 1:20 PM October 20, 2024 1:20 PM

views 16

दिवाळी आणि छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेकडून ५७० विशेष फेऱ्या

दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. या रेल्वेंमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेल...