November 5, 2024 10:36 AM

views 16

छटपूजेच महापर्व आजपासून सुरू

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्य नारायणच्या छट पूजेच महापर्व आजपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज नहाय खाय हा पूजा विधी, उद्या खरना विधी, गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्त पूजा तर शुक्रवारी पहाटे सुर्योदयाला पूजा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करून या महापर्वाची सांगता होईल. दरम्यान सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं दिल्लीतून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी 22 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

October 26, 2024 10:39 AM

views 41

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर,उत्तर रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत विशेष गाड्यांच्या 195 अतिरिक्त फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या प्रामुख्याने नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांवरून पूर्वेकडील प्रदेशांसाठी रवाना होतील.   उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या वर्षी एक लाख सत्तर हजारांहून अधिक अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत. या विशेष ...

October 24, 2024 8:02 PM

views 55

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त ७ हजार विशेष रेल्वेगाड्या

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे ७ हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.