July 20, 2025 7:03 PM July 20, 2025 7:03 PM

views 10

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत कोणताही विचार नाही – मंत्री छगन भुजबळ

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नाही, असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या असा कोणाताही विचार नसल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, जर तसं काही करायचं असल्यास मित्र पक्षांचा सल्ला घेणं, त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं भुजबळ म्ह...

December 18, 2024 6:32 PM December 18, 2024 6:32 PM

views 14

ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार-छगन भुजबळ

राज्यमंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नसल्याबद्दल नाराज झालेल्या समर्थकांची आज नाशिकमधे बैठक झाली.  ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. भविष्यातल्या राजकीय वाटचालीबाबात राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच आपली भूमिका स्पष्ट करु, असं ते म्हणाले. या बैठकीला समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित अनेकांनी छगन भुजबळ यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा अशी सू...

December 17, 2024 8:44 PM December 17, 2024 8:44 PM

views 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं समर्थकांचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचा त्यांच्या समर्थकांनी निषेध केला आहे. या संदर्भात आपल्या मतदारसंघात जाऊन, नागरीक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.  नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती. मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल, असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.   दरम्यान ...

December 16, 2024 6:26 PM December 16, 2024 6:26 PM

views 8

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली. काल रात्री काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले होते.                                                                                                                                                                                ...

November 8, 2024 3:43 PM November 8, 2024 3:43 PM

views 9

ईडी कारवाईतून सुटका करण्यासाठी महायुतीमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं भुजबळांकडून खंडन

ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहीलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकाने छापलं आहे. मात्र या दैनिकाबरोबर आपली काही मुलाखत झालेली नाही, आपण कोणतंही पुस्तक लिहीलेलं नाही, तसंच ईडीच्या कारवाईचा आणि आपण सरकारमधे सामील होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी आज ना...

August 21, 2024 5:43 PM August 21, 2024 5:43 PM

views 13

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक – मंत्री छगन भुजबळ

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितलं. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज रास्त भाव दुकानदारांची बैठख झाली, यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल उपस्थित होते.  रास्त भाव दुकानारांना स्टेशनरी आणि भाजीपाला विकायला परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातल्या ५६ हजार दुकानदारांना झाला आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं. या दुकानदारांना क्विंट...

June 17, 2024 7:28 PM June 17, 2024 7:28 PM

views 11

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ

समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तसंच ओबीसी आंदोलकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.

June 16, 2024 8:06 PM June 16, 2024 8:06 PM

views 16

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मंत्री छगन भुजबळ अडचणीत

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी येत्या २८ तारखेला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश मुंबईतल्या सत्र न्यायालयानं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिले तर वॉरंट बजावण्याचा इशाराही न्यायालयानं दिला आहे.   मुंबईत कलिना इथं राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणी सुनावणी पुढं ढकलण्यासाठी भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होत...