September 6, 2024 10:56 AM September 6, 2024 10:56 AM

views 8

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयासमोर सर्व समान असून, मूर्तिकार आपटेची सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

August 31, 2024 5:11 PM August 31, 2024 5:11 PM

views 15

शिवरायांच्या पुतळ्याचे रचना सल्लागार चेतन पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मालवणच्या राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रचना सल्लागार चेतन पाटील  याला ५ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.  चेतन पाटील याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसानी अटक करुन मालवण पोलीसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलिसांनी त्याला आज मालवण न्यायालयात हजर केलं. सरकारी वकील तसंच आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी त्याला  पोलीस कोठडी सुनावली.