October 14, 2024 3:31 PM October 14, 2024 3:31 PM

views 2

पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना धनादेश आणि स्मृतीचिन्ह देण्यात आलं.   ऑलिंम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनु...

September 22, 2024 7:22 PM September 22, 2024 7:22 PM

views 13

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या प्रकारात भारताची सुवर्णपदकाला गवसणी

  हंगरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी आणि डी. गुकेश या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. या दोन्ही गटांमधले इतर सामने अद्याप सुरू आहेत.