November 10, 2025 1:36 PM November 10, 2025 1:36 PM

views 23

FIDE Chess World Cup : कार्तिक वेंकटरमण चौथ्या फेरीत दाखल

गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत, कार्तिक वेंकटरमण यानं बोगदान-डॅनियल डीक याच्यावर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर विदित गुजराती, नारायण एसएल तसंच विश्वविजेता डी. गुकेश आणि अरविंद चिंथबरम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.   अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी हरिकृष्ण आणि जागतिक ज्युनियर विजेता व्ही प्रणव यांनी आधीच चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

August 12, 2025 2:32 PM August 12, 2025 2:32 PM

views 23

जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या महिला वेगवान  बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या लेई टिंगजीला १०-३ असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दिव्याने नुकतीच जॉर्जिया इथं झालेली  फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. उपांत्य फेरीत येत्या गुरुवारी तिचा मुकाबला चीनची ग्रँडमास्टर हाउ यीफान हिच्याशी होणार आहे.

July 31, 2025 7:23 PM July 31, 2025 7:23 PM

views 29

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला ३ कोटी रुपयांचं बक्षीस

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला ३ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तिच्या प्रशिक्षकांना ३० लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. येत्या शनिवारी नागपूरमध्ये तिचा सत्कार केला जाणार आहे. भारताच्या कोनेरु हंपीला अंतिम फेरीत पराभूत करुन तिनं विश्वचषकात विजय मिळवला होता.

July 19, 2025 1:32 PM July 19, 2025 1:32 PM

views 14

फिडे जागतिक महिला करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय खेळाडूंचा प्रवेश

भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी FIDE जागतिक करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.   त्यामुळं भारत या स्पर्धेच्या अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला पहिला देश बनला आहे. पहिल्या आठमध्ये चार भारतीय खेळाडू असल्यानं, आता भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस आहे.  

June 2, 2025 11:57 AM June 2, 2025 11:57 AM

views 20

बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशचा कार्लसनवर विजय

नॉर्वे इथल्या बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशनं मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. क्लासिकल प्रकारात गुकेशचा कार्लसनवर हा पहिलाच विजय आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्पर्धेत गुकेशनच्या विजयामुळं विजेतेपदाची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे.

November 27, 2024 10:07 AM November 27, 2024 10:07 AM

views 8

८ वर्षाखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिवीथ रेड्डीला सुवर्णपदक

इटलीमध्ये सुरू असलेल्या आठ वर्षाखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आठ वर्षांच्या दिवीथ रेड्डीनं सुवर्णपदकाला गवसणी घालत अजिंक्यपद पटकावलं. तेलंगणाच्या दिवीथ यानं, स्वकीय सात्विक स्नेवशीसोबत बरोबरी साधत ११ पैकी ९ गुण मिळवत ही कामगिरी केली. सात्विकने रौप्य तर चीनच्या झिमिंग गुओनं कांस्यपदक पटकावले.

September 17, 2024 2:03 PM September 17, 2024 2:03 PM

views 10

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या संघाची आगेकूच

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध ३ -१ असा विजय मिळवला आहे. तर महिलांच्या संघाने आर्मिनियावर अडीच विरुद्ध दीड अशा गुणफरकाने मात केली. बुडापेस्ट मधे चाललेल्या या स्पर्धेत भारताने आघाडी मिळवली आहे. भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याने सलग ६ सामने जिंकले तर डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद यांनी आपापले सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विदित गुजराथीने एक सामना जिंकला. महिलांमधे दिव्या देशमुखने आर्मिनियाबरोबरचा सामना जिंकला. डी हारिका आणि आर वैशाली या दोघींचे सामने अनिर...

June 14, 2024 10:19 AM June 14, 2024 10:19 AM

views 46

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख नं जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिनं कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं काल झालेल्या अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रास्तेव्हा हिचा केवळ २६ चालीत पराभव केला. दिव्याचं जागतिक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. दिव्यानं या स्पर्धेत ११ पैकी ९ सामने जिंकले तर दोन सामने बरोबरीत सोडवले.