April 15, 2025 9:02 AM April 15, 2025 9:02 AM

views 2

आयपीएल – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि आपली पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ संघानं निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबेच्या धमाकेदार खेळीमुळे चेन्नईनं १९ षटक आणि तीन चेंडूत १६७ धावांचं लक्ष्य गाठलं आणि सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

April 9, 2025 10:27 AM April 9, 2025 10:27 AM

views 6

पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी केला पराभव

आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जला २०१ धावा करता आल्या.   दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. आज संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान अहमदाबाद इथं सामना होणार आहे.

April 5, 2025 1:48 PM April 5, 2025 1:48 PM

views 8

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईमध्ये दुपारी साडेतीन वाजता सामना होणार आहे. तर चंदीगढमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात संध्याकाळी ७ वाजता सामना होईल. दरम्यान काल लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायन्ट्सनं सलामीवीर मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूत ६७...