June 27, 2025 3:44 PM

views 12

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत पुरुष गटातल्या विजेतेपदासाठी महाराष्ट्राची तामिळनाडूशी लढत

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामने आज दुपारी चेन्नईत होणार आहे. पुरुष गटात तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संघाची लढत आज दुपारी चार वाजता होणार आहे. महिलांच्या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज झालेल्या सामन्यात हरयाणानं यजमान तमिळनाडूचा ४-३ असा पराभव केला. तर पुरुषांच्या गटात चंदीगढनं ओदिशावर २-१ अशी मात करत तिसरा क्रमांक मिळवला.

March 22, 2025 1:37 PM

views 14

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी बैठक चेन्नईत सुरु

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं होत आहे. आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं स्टालिन म्हणाले.   मतदारसंघांची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर झाल्यास लोकसंख्या नियंत्रण यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांवर अन्याय होईल, असं ते म्हणाले. पुनर्रचना करताना देशाच्या विविधतेचं रक्षण व्हायला हवं, अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडली.   कर्न...

February 7, 2025 5:28 PM

views 14

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत या भारतीय जोडीचा सामना शिंतारो मोचीझुकी आणि कैतो युसुगी या जपानी जोडीबरोबर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल.

January 24, 2025 10:37 AM

views 24

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या वीस षटकांचा सामना

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या संघांमध्ये उद्या वीस षटकांचा सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालचा भारताचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य असा आघाडीवर आहे.

December 14, 2024 2:36 PM

views 18

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री E V K S एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजारानं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार E V K S एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. द्रविड चळवळीचे प्रणेते ई व्ही रामासामी पेरियार यांचे भाऊ ई व्ही क्रृष्णसामींचे ते नातू होत. एलंगोवन २००४ ला गोपीचेट्टीपलयम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. २००४ ते २००९ या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम केलं होतं. एरोड पूर्व मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेतही ते दोनदा निवडून आले होते.