January 20, 2025 8:25 PM January 20, 2025 8:25 PM

views 9

छत्तिसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

छत्तिसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. घटनास्थळावर सापडलेली  स्वयंचलित रायफल जप्त करण्यात आली आहे.  या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला रायपूरला हलवण्यात आलं आहे.

January 12, 2025 8:19 PM January 12, 2025 8:19 PM

views 1

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज सकाळी  सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच  माओवादी ठार झाले असून  यात दोन महिला बंडखोरांचा समावेश आहे.  बिजापूर जिल्हयातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं या भागात  शोध मोहिम राबवली.  या अभियानात मोठ्या प्रमाणावर  शस्त्रसाठा आणि दारुगोळा  हस्तगत करण्यात आला असून  यात एक स्वयंचलित रायफल आणि बी जी एल लाँचरचा   समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजुनही सुरु आहे.

January 7, 2025 11:28 AM January 7, 2025 11:28 AM

views 2

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात आठ सैनिकांना वीरमरण

छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात आठ सुरक्षा सैनिक आणि चालक ठार झाले. पंधरा जणांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाची तुकडी, संयुक्त कारवाईनंतर काल दंतेवाडा इथून वाहनानं परतत असताना कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत पाच सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.