January 18, 2026 8:12 PM

views 5

छत्तीसगडमधे मारल्या गेलेल्या माओवाद्यांची संख्या सहावर

  छत्तीसगडमधे बिजापूर जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमधे सुरु असलेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांची संख्या सहावर पोचली आहे. त्यापेकी चार जणांची ओळख पटली असून त्यात नॅशनल पार्क क्षेत्र समितीचा विभागीय समिती सदस्य दिलीप बेडजा याचा समावेश आहे.  चकमकीच्या ठिकाणावरुन सहा रायफल्स सुरक्षा दलांनी हस्तगत केल्या आहेत.  दरम्यान,माओवाद्यांनी हिसाचार थांबवावा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन छत्तीसगडचे उपमुख्यमंत्रीविजय शर्मा यांनी केलं आहे. त्यांच पुनर्वसन करुन त्य...

December 3, 2025 8:27 PM

views 20

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार, ३ जवान शहीद

छत्तीसगडमधे विजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ माओवादी मारले गेले. यात जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक दलाचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान गंभीररित्या जखमी झाला. या मोहिमेत दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यातले केंद्रिय राखीव पोलीस दल, विशेष कडती दल, आणि कोब्रा युनिटचे जवानही सहभागी झाले होते. दंतेवाडा - बिजापूर सीमेवर हे माओवादी असल्याची खबर मिळाल्यावर या सर्वांनी तिथं संयुक्त शोध मोहीम सुरु केली होती. या मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक सुरु झाली. देन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आह...

May 23, 2025 9:16 PM

views 18

गडचिरोलीत चार जहाल नक्षलवादी ठार, तर छत्तीसगडमध्ये ३३ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यात भामरागड दलमचा कमांडरचा आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरुन संयुक्त शोध मोहिम सुरू केली होती. ही मोहिम सुरू असताना आज सकाळी  नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी मारले गेल...

April 18, 2025 8:20 PM

views 18

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. यात नऊ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सुकमाच्या बडेसेट्टी पंचायतमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून पंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्व नक्षलवाद्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी द...

April 8, 2025 8:44 PM

views 15

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यातल्या चौघांवर २६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. यावर्षी बिजापूर जिल्ह्यात १८० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 

April 7, 2025 7:53 PM

views 20

छत्तीसगडमधे ३१ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तिसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधे मिळून आज ३१ माओवाद्यांनी शरणागती पत्करली.  दंतेवाडा जिल्ह्यातून २६ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं.   नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून या प्रत्येकीवर एक लाख रूपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केल्याबद्दल या माओवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन योजनेनुसार देण्यात आला आहे. त्याचबरोबर नक्षल पुनर्वसन धोरणानुसार ...

March 30, 2025 8:38 PM

views 25

छत्तीसगढमधे प्रधानमंत्र्याच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगढ मधे ३३ हजार सातशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि  लोकार्पण केलं. बिलासपूर जिल्ह्यात मोहभट्टा इथं झालेल्या या कार्यक्रमात वीज निर्मिती, रस्तेबांधणी, रेल्वे, शिक्षण आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश होता. आदिवासी भागाच्या विकासाकरता धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान सुरु झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. नक्षली उपद्रवाने त्रस्त भागात आता शांतीचं युग आलं असून त्या भागातल्या अनेक बंद पडलेल्या शाळा आता सुरु झाल्या आहेत असं ते म्ह...

March 29, 2025 7:38 PM

views 24

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. यामध्ये ११ महिलांचा  समावेश आहे.  केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी  मोहीम राबवली होती. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. ठार झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचं नाव जगदीश उर्फ बुधरा असं आहे. पोलिसांनी त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.    घटनास्थळावरून पोल...

March 25, 2025 3:10 PM

views 16

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलानं बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही कारवाई केली. यावेळी त्यांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

February 19, 2025 9:02 PM

views 14

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत आज झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या सीमेवर ही चकमक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यात काही नक्षलवादी जखमी झाले, मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्रास्त्र जप्त केली आहेत.