December 11, 2025 3:04 PM December 11, 2025 3:04 PM

views 32

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार

क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार आहे.   संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-०नं आघाडीवर आहे.

December 8, 2025 9:43 AM December 8, 2025 9:43 AM

views 3

छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट

छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू पुडुचेरी आणि कराईकल इथं काही ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.     पुढील चार दिवस आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी दाट धुक्याची परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

November 19, 2025 1:35 PM November 19, 2025 1:35 PM

views 5

छत्तीसगडमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू

छत्तीसगडमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत ४ नोव्हेंबरपासून राज्यातल्या ९९ टक्के नागरिकांना नोंदणी अर्ज देण्यात आले आहेत.   बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारसंघात अर्ज द्यायला आणि जमा करायला जात आहेत. तसंच जमा केलेल्या अर्जांचं डिजिटायशेन केलं जात असून आतापर्यंत २७ लाख अर्जांचं डिजिटायजेशन करण्यात आलं आहे.  

September 11, 2025 7:54 PM September 11, 2025 7:54 PM

views 13

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत १० नक्षलवादी ठार, २६ जणांना अटक

छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यातल्या मैनपूर भागात आज सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये  सुमारे १ कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनोज याचाही समावेश आहे. या भागातल्या जंगलात मोठया संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलानं शोध मोहीम सुरु केली होती.     अशाच एका मोहिमेत, सुरक्षादलानं छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या विविध भागातून २६ नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी ६ नक्षलवाद्यांवर सुमारे १३ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्...

August 18, 2025 2:26 PM August 18, 2025 2:26 PM

views 8

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद

छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात बिजापूर जिल्ह्यात आज माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला. तर तीन जवान जखमी झाले. जिल्हा राखीव रक्षक दलाचं एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना राष्ट्रीय उद्यान परिसरात हा स्फोट झाला.

July 19, 2025 1:12 PM July 19, 2025 1:12 PM

views 10

छत्तीसगड : नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगड मधे नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. राज्याचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुझमाडच्या जंगलात कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

May 23, 2025 1:15 PM May 23, 2025 1:15 PM

views 10

छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किस्ताराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी चकमक झाली. या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला. या भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्यदल आणि केंद्रीय राखील पोलिसांची कोब्रा बटालियन यांना पाठवलं होतं. सुरक्षा दलाच्या जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्या ठिकाणी चकमक झाली तिथं आणि आजूबाजूच्या परिसरात इतर नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

March 23, 2025 8:07 PM March 23, 2025 8:07 PM

views 12

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातल्या २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मिळून एकूण ११ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगड सरकारच्या धोरणानुसार या नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.

February 10, 2025 9:02 AM February 10, 2025 9:02 AM

views 14

छत्तीसगढमध्ये 31 नक्षलवादी ठार

छत्तीसगढमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काल 31 नक्षलवादी ठार झाले आणि 2 जवान शहीद झाले. बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर यांच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम राबवून ही कारवाई केल्याचं बीजापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितलं.   घटनास्थळावरून एके-47, सेल्फ-लोडिंग आणि इन्सास रायफल्ससह बॅरल ग्रेनेड लाँच...