December 12, 2025 8:21 PM

views 17

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात दहा माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर ३३ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील एके-४७, दोन एसएलआर रायफल, एक स्टेन गन आणि एक बॅरेल ग्रेनेड लाँचर आदी शस्त्रं पोलिसांकडे जमा केली. 

December 6, 2025 2:27 PM

views 24

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी आतापर्यंत २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. बुथ स्तरावरचे कर्मचारी आणि अधिकारी छत्तीसगडच्या अनेक दुर्गम आणि आदिवासीबहूल भागातल्या मतदारांशी संपर्क साधत आहेत.