March 21, 2025 7:23 PM March 21, 2025 7:23 PM

views 4

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठीची जबाबदारी आता पर्यटन विभागाकडे

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी कार्यान्वयन आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला.   स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ञांसह इतर जाणकारांची समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण आणि अनुषंगिक बाबींची जबाबदारी पर्यटन विभागाकडे दिली आहे.