May 14, 2025 7:05 PM May 14, 2025 7:05 PM

views 14

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं आहे.    शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी राजे यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा, अशा शब्दात फडनवीस यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं...

February 19, 2025 8:40 PM February 19, 2025 8:40 PM

views 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवरायांची जयंती फक्त भारतातच नाही तर २० देशांमध्ये साजरी केली जाते. त्यांचं प्रशासन, कल्याणकारी धोरणं, संरक्षण आणि नौदलाचं व्यवस्थापन, दूरदर्शी नेतृत्व हे अतुल...

February 19, 2025 8:37 PM February 19, 2025 8:37 PM

views 13

देश – विदेशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ वी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं, चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरवणुका आणि पदयात्रांमधे शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत करतब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून..   संसद भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आलं. नवीदिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती सोहळा झाला. भारत...

February 18, 2025 8:05 PM February 18, 2025 8:05 PM

views 12

राज्यभरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन

राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं जय शिवाजी, जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं आहे. उद्यापासून त्याचा प्रारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पदयात्रेचं उद्घाटन करतील. संपूर्ण राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रांचं आयोजन करण्यात आहे. पुणे जिल्ह्यातल्या पदयात्रेत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणापासून ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यं...