September 27, 2024 10:16 AM

views 27

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची गुंठेवारी नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरणासाठी ५० टक्के बेटरमेंट चार्जेस अर्थात विकास आकाराची सवलत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या सवलतीची मुदत येत्या ३० तारखेला संपणार होती. मात्र मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार २०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी वापराच्या भुखंडासाठी ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन संबंधित नागरिकांनी आपलं बांधकाम नियमित करून घेण्याचं आवाहन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केलं आहे.