June 29, 2025 3:21 PM June 29, 2025 3:21 PM

views 5

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, पुढच्या २४ तासांसाठी चार धाम यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्यामुळे पुढच्या २४ तासांसाठी चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर इथं यात्रेकरूंना थांबवण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.

April 28, 2025 11:05 AM April 28, 2025 11:05 AM

views 11

७७ पाकिस्तानी नागरिकांची चारधाम यात्रा नोंदणी रद्द

चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहीब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड सरकारनं रद्द केली आहे. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सतपाल महाराज यांनी काल ही घोषणा केली.   दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार सर्व भाविकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही ते म्हणाले. चारधाम यात्रेसाठी २२ लाख भाविकांनी नोंदणी केली असून यात इतर देशातल्या २५ हजार भाविकांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. 

April 27, 2025 6:55 PM April 27, 2025 6:55 PM

views 6

चारधाम यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी रद्द

चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहीब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड राज्य सरकारने रद्द केली आहे. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सतपाल महाराज यांनी आज ही घोषणा केली. दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार सर्व भाविकांना सुरक्षिततेचा अनुभव देण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही ते म्हणाले. चारधाम यात्रेसाठी २२ लाख भाविकांन नोंदणी केली असून यात इतर देशातल्या २५ हजार भाविकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.