September 19, 2025 10:14 AM September 19, 2025 10:14 AM

views 4

डीजीसीएची चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी

विमानवाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीएनं चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी दिली आहे. मॉन्सून संपल्यानंतर ही सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षाविषयक अनेक तपासण्यांनंतर ही परवानगी देण्यात आल्याचं विमानवाहतूक मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासह डीजीसीए, विमानतळ प्राधिकरण आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. तसंच डीजीसीएनं सर्व हेलिपॅड्स, हेलिकॉप्टर्स आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या ...