September 19, 2024 9:36 AM
14
एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या
एक देश एक निवडणूक या संकल्पनेची वास्तविकता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं विविध राजकीय पक्ष आणि तज्ञांसह संबंधितांशी देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केल्याचंही वैष्णव या...