November 11, 2024 7:02 PM
10
मविआचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली, मात्र आता ते याच योजने अंतर्गत महिलांना तीन हजार रुपये देऊ, असं आश्वासन देत आहेत असं बावनकुळे म्हणाले. राज्यातली जनता महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.