November 3, 2025 7:21 PM November 3, 2025 7:21 PM

views 33

राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं-चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं आहेत, असं सांगत राज्यातल्या मतदार यादीत अनियमितता असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कामठीत सुमारे ८ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावं दुबार आहेत. या संदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदार यादीत नावं समाविष्ट होतात, पण गाळली जात नाहीत, हा मुख्य प्रश्न आहे, असं बावनकुळे म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती असंही बावनकुळे त्या...

October 11, 2025 8:07 PM October 11, 2025 8:07 PM

views 98

Maharashtra: जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार

जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागानं यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारनं यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी १२ लाख मोजणी प्रकरणं वेगाने मार्गी लागतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी आणि स...

April 28, 2025 3:08 PM April 28, 2025 3:08 PM

views 5

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

दहशतवाद्यांना जात धर्म नसतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  केला आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. वडेट्टीवार यांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असंही बावनकुळे म्हणाले.    पहलगाम इथं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हेतू देशातल्या नागरिकांमधे फूट पाडणं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढ...

March 5, 2025 8:35 PM March 5, 2025 8:35 PM

views 19

Stamp Duty: प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.   राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारे ५...

February 13, 2025 8:13 PM February 13, 2025 8:13 PM

views 12

वाळू माफियांवर मकोका लावण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांच्यावर मकोका लावणे, हद्दपार करणे अश्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज अकोल्यात भाजपच्या विभागीय मेळाव्यादरम्यान बोलत होते. कडक कायदे असणारं नवं वाळू धोरण लवकरचं जाहीर करण्यात येणार असल्याचही ते म्हणाले. ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाहीत ते ईव्हीएम मशीनवर ठपके ठेवत असल्याचा आरोप विरोधकांवर करताना महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

January 7, 2025 7:59 PM January 7, 2025 7:59 PM

views 5

१० जानेवारीला होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल- बावनकुळे

भारतीय जनता पक्षाने दीड कोटी प्राथमिक सदस्य आणि ५ लाख सक्रीय सदस्यांचं लक्ष्य ठेवल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. १० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १२ जानेवारी रोजी अहिल्यानगर इथं होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जवळपास १५ हजार कार्यकर्ते येणार असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री अमित शहा, तर समारोपाच्या...

January 6, 2025 8:27 PM January 6, 2025 8:27 PM

views 12

भाजपा-महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही-चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसल्याचं महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात गेले होते, त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही. या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारची चौकशी सुरू केली असून आरोपींना कठोरातली कठोर ...

December 13, 2024 2:49 PM December 13, 2024 2:49 PM

views 9

भाजपाचं प्रदेश अधिवेशन येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनी शिर्डीत होणार

शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारीला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थितीत हे प्रदेश अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांच्या उपस्थिती असणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजपची महाराष्ट्रातील युवकांना साथ आहे. विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरूणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान सुरू...

November 18, 2024 7:34 PM November 18, 2024 7:34 PM

views 4

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील-चंद्रशेखर बावनकुळे

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूरात ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने लोकसभेत खोटा प्रचार केला असून त्यावर जनतेचा विश्वास उरला नाही, त्यामुळे हरियाणात झालं तसंच महाराष्ट्रात होईल, असा दावा त्यांनी केला.

November 11, 2024 7:02 PM November 11, 2024 7:02 PM

views 8

मविआचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली, मात्र आता ते याच योजने अंतर्गत महिलांना तीन हजार रुपये देऊ, असं आश्वासन देत आहेत असं बावनकुळे म्हणाले. राज्यातली जनता महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.