January 24, 2026 7:25 PM

views 1

चंद्रपूर आणि लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

चंद्रपूर आणि लातूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू असून दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्रपक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं.परभणी महानगरपालिकेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.