August 3, 2025 6:59 PM August 3, 2025 6:59 PM

views 9

संपूर्णता अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक

आकांक्षित जिल्हे आणि तालुके या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळालं आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात झाला.    या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यव...

March 15, 2025 9:07 PM March 15, 2025 9:07 PM

views 14

चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली. हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साटगाव कोलारी इथले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व युवकांचे मृतदेह  बाहेर काढले असून यातले चार जण एकाच कुटुंबातली भावंडं आहेत.

February 13, 2025 8:04 PM February 13, 2025 8:04 PM

views 9

Cyber Froud: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३,७०,६४,७४२ रुपये लंपास

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनईएफटी आणि आरटीजीएस ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये लंपास केले आहेत. बँक व्यवस्थापकांनी याची तक्रार पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे केली आहे. पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई करत ३३ खाती गोठविली असून यातून प्रत्यक्ष ६० लाख रुपये बँकेला परत आले आहेत तर अन्य बँकांमधील ७१ लाख होल्ड करण्यात आले असल्याने बँकेला आतापर्यंत १ कोटी ३२ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप असून त्याद्वारे ऑ...

January 9, 2025 7:29 PM January 9, 2025 7:29 PM

views 8

‘सकारात्मक उपाययोजनांमधून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल’

सकारात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते आज चंद्रपूरमध्ये ‘वाईल्डकॉन – २०२५’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आलेली ही  देशातली पहिलीच परिषद होती.  वनक्षेत्रात विकास कामं होत असल्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव-वन्यज...

November 9, 2024 4:41 PM November 9, 2024 4:41 PM

views 17

सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारनं राज्यात अनेक समाजोपयोगी योजना आणल्या असं सांगत सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ, असं आश्वासन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. चंद्रपूर इथं प्रचारसभेत ते बोलत होते. महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.  

September 11, 2024 3:17 PM September 11, 2024 3:17 PM

views 20

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या गणेशपुर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही घटना वन्य प्राण्यांपासून शेत-पिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळं घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

September 9, 2024 7:06 PM September 9, 2024 7:06 PM

views 19

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.    हवामान विभागानं मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट दिला आहे. ...

September 6, 2024 6:50 PM September 6, 2024 6:50 PM

views 26

चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार

चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून  प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत मंडपम, राम मंदिरासाठी जिल्ह्यातलं सागवान पाठवलं आहे.

July 20, 2024 2:49 PM July 20, 2024 2:49 PM

views 18

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.