October 12, 2025 1:01 PM October 12, 2025 1:01 PM
15
केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, मेघायल, कर्नाटकचा समुद्रकिनारा, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि कर्नाटकचा दक्षिणी भागातही जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. पुढील चार दिवसांत केरळ, माहे, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांत विजांसह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.