November 28, 2025 1:24 PM

views 11

जागतिक विचारमंथनाला दिशा देण्याचं काम आजचा भारत करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक विचारमंथनाला दिशा  देण्याचं काम आजचा भारत करत असून हिंद प्रशांत आणि ग्लोबल साऊथमधले देश एक विश्वासू भागीदार म्हणून भारताकडे पाहतात, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित यंदाच्या चाणक्य संरक्षण परिसंवादात ते आज बोलत होते. विस्तारत जाणारी आपली अर्थव्यवस्था, अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रगती आणि तत्वनिष्ठ राजनैतिकतेसाठी दृढ  वचनबद्धता यांनी  आपल्याला समतोल, स्थिर आणि जबाब्दारीपूर्ण आवाज मिळवून दिला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.    भारतानं नेहमीच शांतता आणि परस्प...