March 20, 2025 3:17 PM

views 14

Champions Trophy : भारतीय संघाला ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक

आयसीसी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेट नियामक मंडळानं ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितलं की आयसीसीचं विजेतेपद लागोपाठ मिळवणं ही विशेष कौतुकाची बाब आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईमधे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन विश्वकरंडकावर नाव कोरलं होतं. 

December 19, 2024 8:10 PM

views 11

भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे क्रिकेट सामने त्रयस्थ देशात खेळवण्याचा ICC चा निर्णय

पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे सामने इतर ठिकाणी खेळवले जाणार असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात आणि इतर ठिकाणी अशी हायब्रिड पद्धतीनं खेळवली जाणार आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेने आयोजित केलेल्या पुरुष टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी देखील हा निर्णय लागू असेल असं आयसीसीनं म्हटलं आहे.