August 27, 2024 10:25 AM August 27, 2024 10:25 AM

views 10

जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन येत्या 30 तारखेला भाजपामध्ये प्रवेश करणार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन या महिन्याच्या 30 तारखेला रांची इथं भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी समाज माध्यमावर एका संदेशातून केली आहे. ते भाजपाचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी देखील आहेत. सरमा यांच्यासह सोरेन यांनी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अलीकडेच चंपई सोरेन यांनी JMMनेतृत्वावर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

August 21, 2024 8:04 PM August 21, 2024 8:04 PM

views 2

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा

झारखंड मुक्ती मोर्चामधल्या वाढत्या तणावानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. झारखंडच्या सरायकेला - खरसावन इथं आपल्या मतदारसंघातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपण राजकीय संन्यास घेत नसून नव्या आघाड्या करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे समविचार पक्षांशी आपण हातमिळवणी करू, असं सोरेन यावेळी म्हणाले.