October 24, 2025 8:21 PM October 24, 2025 8:21 PM

views 40

गाझियाबाद इथं केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुधारीत वस्तू आणि सेवाकरामुळे करप्रणाली अधिक कार्यक्षम, समन्यायी आणि विकास केंद्रित होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज गाझियाबाद इथं नव्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्षम करप्रणालीमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवाकराअंतर्गत सुलभ नोंदणी योजना १ नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.