October 14, 2025 7:18 PM October 14, 2025 7:18 PM
70
मविआतर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांमधली नाव नोंदणी, मतदान प्रक्रियेमधली पारदर्शकता, व्हीव्ही-पॅट पद्धतीचा वापर, ईव्हीएम मशीन, या आणि इतर मुद्द्यांबाबत आपलं निवेदन सादर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस ने...