November 15, 2024 4:45 PM November 15, 2024 4:45 PM

views 10

मतदानाच्या दिवशी मुंबईत विशेष लोकल सेवा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाड्या १९ ते २१ या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास करतील. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.  

November 6, 2024 6:17 PM November 6, 2024 6:17 PM

views 9

कार्तिकी यात्रेनिमित्त ३ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या

पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३ विशेष अनारक्षित गाड्या चालवणार आहे. ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून या गाड्या चालवण्यात येणार आहेत. लातूर-पंढरपूर-लातूर ही गाडी १२ आणि १३ नोव्हेंबरला चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.          

October 7, 2024 3:46 PM October 7, 2024 3:46 PM

views 10

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरसाठी विशेष रेल्वे गाड्याचं नियोजन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेनं नागपूरसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचं नियोजन केलं आहे. पुणे-नागपूर विशेष रेल्वे गाडी पुण्याहून ११ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी सकाळी पावणे सात वाजता नागपूरला पोहचेल. ही गाडी नागपूरहून १२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्यादिवशी रात्री ८ वाजता पोहचेल.