December 4, 2025 3:32 PM December 4, 2025 3:32 PM

views 86

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या धावणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई, कलबुर्गी ते मुंबई, अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वे कल्याण ते परळ मार्गावरही १२ अतिरीक्त रेल्वेगाड्या चालवणार असल्याचं मध्य रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

June 27, 2025 4:18 PM June 27, 2025 4:18 PM

views 10

मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या 1 ते 10 जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहेत. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी 83 आषाढी विशेष गाड्याही चालवल्या जात आहेत. 29 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह तिकीटविक्री सुरू होईल. तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.  

March 23, 2025 3:37 PM March 23, 2025 3:37 PM

views 15

प्रवाशांच्या सेयीसाठी ‘उन्हाळी विशेष रेल्वे’ !

उन्हाळ्याच्या सुट्टीमधे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड, मुंबई - नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे - नागपूर आणि दौंड - कलबुर्गी दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत. काही अनरक्षित गाड्या वगळता बाकीच्या गाड्यांचं आरक्षण उद्यापासून खुलं होणार आहे.

March 8, 2025 8:31 PM March 8, 2025 8:31 PM

views 10

Women’s Day: मध्य रेल्वेनं संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं आज संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज सकाळी ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली. या गाडीत लोको पायलट, सहायक लोको पायलट, रेल्वेगाडी व्यवस्थापक, तिकीट तपासक, तसंच आहारसेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत. 

March 5, 2025 9:47 AM March 5, 2025 9:47 AM

views 15

मध्य रेल्वेचे ११ कर्मचारी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना यांच्या हस्ते काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   कल्याण स्थानकात, सिग्नल आणि दूरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या साक्षी गुप्ता यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारार्थिंनी, आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेलं समर्पण आणि दक्षता प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे, असं मिना या प्रसंगी बोलताना म्हणाले.

February 10, 2025 7:13 PM February 10, 2025 7:13 PM

views 11

Mahakumbh 2025 : मध्यरेल्वे १६ गाड्या चालवत असून परिस्थिती सुरळीत

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे १६ गाड्या चालवत असून या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे २० विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत. इथल्या रेल्वेस्थानकांवर प्रशासनाचं बारीक लक्ष असून गर्दी जास्त वाढल्यास तिथून तातडीनं अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात...

December 29, 2024 7:02 PM December 29, 2024 7:02 PM

views 19

वर्षअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्यरेल्वेच्या १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटावर निर्बंध

वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध आजपासून २ जानेवारी च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोल...

December 19, 2024 2:59 PM December 19, 2024 2:59 PM

views 11

महाकुंभ मेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या  विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली तसंच www.irctc.co.in या रेल्वेच्या संकेतस्थळावरुन आरक्षण करता येईल. या विशेष गाड्यांमध्ये दुसऱ्या वर्गाचे डबे हे अनारक्षित असतील आणि त्यासाठी रेल्वेच्या युटीएस ॲप वरुन तिकीट काढता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मिळेल.

November 19, 2024 7:58 PM November 19, 2024 7:58 PM

views 14

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. मेट्रोनंही अतिरिक्त वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थाही उपलब्ध सोयही आहे.   यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या...

November 17, 2024 10:42 AM November 17, 2024 10:42 AM

views 12

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मध्य रेल्वेकडून जादा रेल्वे गाड्यांची सोय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकिदरम्यान मध्ये रेल्वे कडून 19 आणि 20 तारखेला जादा रेल्वे गाड्यांची सोय केली जाणार असल्याचं मध्य रेल्वेनं एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते कल्याण आणि पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत. 20 नोव्हेंबर ला होत असलेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान कोणताही अडथळा नं येता सर्वांना मतदान करता यावं यासाठी ही सोय करण्यात आली असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.