December 12, 2024 1:46 PM December 12, 2024 1:46 PM

views 24

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता दोन हजार टनांवरून एक हजार टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा दहा टनांवरून पाच टनांपर्यंत आणण्यात आली आहे. अन्नसुरक्षेचं नियोजन करण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते ...

November 30, 2024 8:50 AM November 30, 2024 8:50 AM

views 10

पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात सम...

November 27, 2024 4:03 PM November 27, 2024 4:03 PM

views 15

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ झाला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. गरीब लाभार्थ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विनामूल्य अन्नधान्य वितरणाचा कालावधी जानेवारी २०२४ नंतर पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

November 26, 2024 7:20 PM November 26, 2024 7:20 PM

views 9

केंद्र सरकार ग्रामीण भागात १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारणार

केंद्र सरकारच्या सहकार से समृद्धी या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारले जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड तसचं राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम असून तो राज्यातल्य प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. त्यातल्या नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी आज करार झाला.   

October 15, 2024 11:21 AM October 15, 2024 11:21 AM

views 9

उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना केंद्र सरकारची मंजुरी

राष्ट्रीय महामार्ग-६३ वर उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या, ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. या मार्गामुळे उदगीर, मुक्रमाबाद आणि देगलूर शहरातल्या औद्योगिक कृषी-व्यावसायिक उपक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.