January 1, 2026 1:32 PM

views 73

२०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष

सरलेलं २०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक, महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वातल्या नवीन युगाचा पाया रचला. केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी ३ हजार ७९४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ला मंजुरी दिली. या नवीन धोरणात भारताला जागतिक क्...

July 2, 2025 8:49 AM

views 34

विकसित भारत अभियानात युवकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारचा ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम

विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ 12 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार असून, या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिली. मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या क्रीडा मंत्री आणि सचिवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशातील युवकांचा विकसित भारत अभियानात जास्तीत जास्त सह...

March 15, 2025 4:01 PM

views 35

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं – ज्येष्ठ नेते शरद पवार

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. २०२४ मधे राज्यात २ हजार ६३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना हे आवाहन केलं. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार म्हणाले.

February 5, 2025 1:26 PM

views 21

देशव्यापी जलसंधारण यात्रेला आजपासून सुरुवात

केंद्रसरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत असून त्याचं उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत चौहान यांनी ही माहिती दिली. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा ६० ते ९० दिवसांत देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देत फिरणार आहे. २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ६ हजार ६७३ ग्रामपंचायतींना ही यात्रा भेट देईल. ही यात्रा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० चा भाग आहे. जलसंधारण आ...

January 18, 2025 11:01 AM

views 21

केंद्र सरकारचं बाजारातील अन्नधान्यांच्या किंमतीवर बारकाईनं लक्ष

ग्राहकांना परवडणाऱ्या दरांत अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार अन्नधान्यांची उपलब्धता आणि बाजारातील किंमतीवर बारकाईनं लक्ष ठेवत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या वर्षी तुरडाळीचं उत्पादन 35 लाख टनापेक्षा अधिक राहाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर मूगडाळीच्या उत्पादनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होईल. तर खरीप कांद्यांचे उत्पादनही अधिक होण्याची अंदाज मंत्रालयानं व्यक्त केला आहे.

December 21, 2024 1:48 PM

views 18

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या ३५० दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल 350 दशलक्ष डॉलर्सचा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला. बहुस्तरीय आणि एकात्मिक मालसाठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे. केंद्र सरकारच्या विविध मालसाठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे.

December 7, 2024 11:15 AM

views 29

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल – केंद्रीय कृषी मंत्री

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चौहान बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचं सांगून, अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत, 2013-14 च्या तुलनेत आता 1 लाख 22 हजार 528 कोटी रुपयांची अभूतपूर्व वाढ केल्याचं त्यांनी नमूद केलं.

November 6, 2024 1:47 PM

views 20

कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासंदर्भात सर्व सरकारी बँका, नाबार्ड आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत केंद्रीय वित्त सेवा सचिव एम. नागाराजू यांनी हे निर्देश दिले. या कर्जवितरणासाठी दिलेली उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात पूर्ण होतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.