December 31, 2025 3:43 PM December 31, 2025 3:43 PM

views 1

उमेदवारांच्या प्रचारखर्चावर कठोर नियंत्रण ठेवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्रमाचे छायाचित्र, खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत बिलं जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रच...

June 27, 2025 10:54 AM June 27, 2025 10:54 AM

views 16

मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू

आवश्यक अटी पूर्ण न केल्याबद्दल देशातील 345 नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं सुरू केली आहे. 2019 पासून आतापर्यंत एकही लोकसभा, विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी या प्रक्रियेत रद्द करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटिस बाजावून त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

November 6, 2024 10:17 AM November 6, 2024 10:17 AM

views 10

केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा घेणार आढावा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाच वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेतला जाईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.