November 12, 2024 11:09 AM November 12, 2024 11:09 AM
10
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान सुरु
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. “आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प...