December 27, 2024 4:02 PM December 27, 2024 4:02 PM

views 8

नववर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून पहाटे दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर ही विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. पहिली ट्रेन चर्चगेटहून पहाटे सव्वा वाजता, दुसरी २ वाजता, तिसरी अडीच वाजता आणि चौथी पहाटे ३ वाजून २५ मिनीटांनी सुटेल. विरारहून पहाटे सव्व...

November 2, 2024 7:26 PM November 2, 2024 7:26 PM

views 9

मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द

मुंबईत उद्या रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर दिवसभर कोणाताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. उद्या भाऊबीज साजरी करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होणार आहे.    पंरतु आज मात्र मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा ऐन दिवाळीच्या दिवसात विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिग्नल न मिळाल्यानं वाहतूकसेवा  विस्कळीत झाली असून लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशिरानं धावत आहे. तर गर्डरचं काम सुरू असल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूकसेवाही धीम्या...

October 28, 2024 10:07 AM October 28, 2024 10:07 AM

views 13

मुंबईतील निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध

दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विभागातील निवडक प्रमुख स्थानकांवरफलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे. फलाट तिकिटांच्या विक्रीवरील हे निर्बंध 8 नोव्हेंबर पर्यंत लागू आहेत.