July 20, 2024 8:51 PM July 20, 2024 8:51 PM
11
‘नीट-यूजी’ परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालाची माहिती जाहीर
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालाची माहिती आज एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. एनटीएने आज दुपारी १२ वाजेपर्यंत शहर आणि केंद्रनिहाय निकालाची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.