July 7, 2025 3:29 PM July 7, 2025 3:29 PM

views 19

आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार

आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमांवर जाहीर केलं. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल, त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे. यासाठी १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कुठलेही बदल करू नये असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना केलं आहे. 

June 17, 2025 3:36 PM June 17, 2025 3:36 PM

views 20

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की, सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना होईल, असं स्पष्ट केलं आहे.   केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली, त्यात जातनिहाय जनगणना होईल, असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे. त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते. जातनिहाय जनगणनेचं काम तेलंगण सरकारनं उत्कृष्टर...

April 30, 2025 7:33 PM April 30, 2025 7:33 PM

views 9

केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार

आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. जातीनिहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा याचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले.    ऊसासाठी २०२५ च्या खरेदी हंगामाकरता ३ हजार ५५० रुपये प्रतिटन एफआरपी अर्थात रास्त भाव द...