February 18, 2025 3:45 PM

views 237

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयाने जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे. नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले...