March 4, 2025 8:01 PM March 4, 2025 8:01 PM
15
सर्व अधिकाऱ्यांनी आपलं काम पारदर्शकरित्या आणि चोखपणे पार पाडावं-मुख्य निवडणूक आयुक्त
सर्व राज्यांचे निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि केंद्र स्तरावरल्या अधिकाऱ्यांनी आपलं काम पारदर्शकरित्या आणि चोखपणे पार पाडावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं. सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेला ते संबोधित करत होते. राजकीय पक्षांशी समन्वय साधावा असंही ज्ञानेश कुमार म्हणाले. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांची मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं. तसंच मतदाराच्या घरापासून दोन ते तीन कि...