September 26, 2024 3:33 PM September 26, 2024 3:33 PM

views 13

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा CDSCOचा अहवाल

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा अहवाल CDSCO अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी ३ प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे. यामुळं या औषधांच्या सुरक्षेविषयी काळजी निर्माण झाली आहे. विविध कंपन्यांनी ही औषधं तयार केली आहेत.

July 17, 2024 6:12 PM July 17, 2024 6:12 PM

views 8

आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची CDSCO अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी CDSCO अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.   औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता राखण्याबाबत नियंत्रण ठेवण्याचं काम CDSCO करते. तत्पूर्वी नड्डा यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनांचा आढावा घेतला होता.