August 22, 2024 3:32 PM
14
राज्यात येत्या महिन्याभरात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक
महाराष्ट्रात बदलापूर, आणि घाटकोपर मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील. कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले...