May 15, 2025 1:47 PM May 15, 2025 1:47 PM

views 5

पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल ऑनलाईन पुरवठा कंपन्यांना नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल Amazon India, Flipkart, Ubuy India, एटसी, द फ्लॅग कंपनी आणि फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटीस बजावली आहेत. अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. अशी असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशी सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पुण्यातल्या सु...

October 13, 2024 8:28 PM October 13, 2024 8:28 PM

views 3

परतावा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत – केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण

परतावा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ओला या परिवहन कंपनीला दिले आहेत. परताव्याचे पैसे थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची  किंवा कुपनद्वारे परतावा मिळवण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, असं प्राधिकरणानं तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान सांगितलं आहे. व्यवहारात पारदर्शकता यावी या उद्देशानं, बुकिंग करून ओला द्वारे प्रवास करणाऱ्यांना पावती देण्याचे निर्देशही प्राधिकरणानं दिले आहेत.