January 23, 2025 9:20 PM January 23, 2025 9:20 PM

views 5

व्हॉटसॲपवर आणलेली बंदी एनसीएलएटीकडून अंशत: स्थगित

सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगानं व्हॉटसॲपवर आणलेली बंदी एनसीएलएटी अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने अंशत: स्थगित केली आहे. एनसीएलएटी पीठाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हे निर्देश दिले. भारतात ५० कोटी व्हॉट्सॲपग्राहक असून त्यावर बंदीमुळे हा व्यवसाय विस्कळीत होईल, असं त्यांनी निर्देशात म्हटलं आहे.  सीसीआयने व्हॉट्सॲपवर डेटा शेअरिंग पद्धतींबद्दल पाच वर्षांची बंदी घातली होती. पुढच्या उपाययोजनांची चाचपणी मेटा करेल आणि लाखो व्यवसायिकांच्या  व्हॉट्सॲपकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करेल ...

September 13, 2024 1:20 PM September 13, 2024 1:20 PM

views 6

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचे आढळले

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट या ई काॅमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे. आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक कंपन्यांनाच उच्च मानांकन दिलं असून ग्राहक एखादी वस्तू ऑनलाईन सर्च करत असताना त्यांना या कंपन्यांना जास्त पसंती असल्याचं दिसून येतं. यामुळे इतर कंपन्यांची उत्पादनं या स्पर्धेत मागे पडतात, असं या अहवालात म्हटलं आहे. या दोन्ही कंपन्या सध्या या अहवालाच...