January 6, 2026 1:20 PM

views 27

सीबीएसईचा समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळण्यास मदत व्हावी यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी या सेवेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते १ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव, वेळेचं व्यवस्थापन तसंच इतर भावनिक तणावांना सामोरं जाता यावं यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे. १ ८ ० ० १ १ ८ ० ० ४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मदत मिळवू शकतात. याद्वारे प्राच...

July 16, 2025 2:55 PM

views 22

निरोगी जीवनशैलीसाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.   पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम यांच्यावर भर देण्याचे निर्देशही सीबीएसईने शाळांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. तसंच, शाळांमध्ये जिन्यांचा वापर, दोन तासांमध्ये छोटी व्यायामाची विश्रांती आणि चालण्याच्या व्यायामाचा समावेश वेळापत्रकांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.

April 5, 2025 7:58 PM

views 20

सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही, मराठी अनिवार्यच राहील, तसंच स्थानिक इतिहासही अभ्यासक्रमातून वगळला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी आज दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचानं आयोजित केलेल्या 'महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न' या चर्चासत्रात ते बोलत होते. या बदलामुळे शिक्षणशुल्कात काहीही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सगळ्यात आधी सीबीएसईच्या शाळांमध्ये सुरू झाली असून...

March 13, 2025 8:57 PM

views 31

१२ वीच्या परीक्षा शनिवारी वेळापत्रकानुसार होणार – CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हे स्पष्ट केलं आहे. या दिवशी मूळ हिंदी आणि वैकल्पिक हिंदी विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

February 15, 2025 3:22 PM

views 23

सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना सुरुवात

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.   यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी १७ लाख ८८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थींनी नोंदणी केली आहे.   १२० विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत. भारतात ७ हजार ८४२ परीक्षा केंद्रे, तसेच परदेशी केंद्रांवर ही परीक्षा...

January 18, 2025 8:23 PM

views 21

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई प्रारुप लागू करणार

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारुप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. याची अंमलजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारुप लागू होईल. त्याअनुषंगानं येत्या एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उरलेल्या इयत्तांसाठी सीबीएसईच्या प्रारुपाप्रमाणे...

November 22, 2024 7:47 PM

views 29

पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तसंच सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानशी संलग्न असलेल्या विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या मुली या योजनेकरता पात्र ठरणार आहेत.    २०२३ दरम्यान इयत्ता १० वीत शिकत असलेल्या, पालकांचं एकमेव अपत्य असलेल्या तसंच  सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या मुलींच्या शिष्यवृत्तीच्या काला...

November 21, 2024 7:41 PM

views 72

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ह...

September 14, 2024 11:03 AM

views 17

राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना सीबीएसईची नोटिस

नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना नोटिस बजावली आहे. यातील 22 शाळा दिल्लीतील असून, पाच शाळा अजमेर मधील आहेत.   मंडळाने या शाळांची अचानक तपासणी केली असता, त्यांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या, विशेषतः नाव नोंदणी आणि नोंदणी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्याचं मंडळाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

July 5, 2024 11:18 AM

views 19

सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तिसरी आणि सहावीची नऊ पाठ्यपुस्तके यापूर्वीच उपलब्ध झाली असून आणखी 8 पाठ्यपुस्तके लवकरच बाजारात येणार आहेत.   2047 पर्यंतच्या अमृत काळाच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक निर्मिती बद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रध...