January 10, 2025 10:17 AM January 10, 2025 10:17 AM

views 10

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआयची कारवाई

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनं भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. हे प्रकरण कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या एका जवळच्या सहाय्यकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीवर मद्यविक्रीसाठी घातलेली बंदी उठवण्याच्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे.

January 7, 2025 1:45 PM January 7, 2025 1:45 PM

views 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सीबीआय च्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआय नं विकसित केलेल्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सीबीआय च्या ३५ अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा यात समावेश आहे. ‘भारतपोल’ पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाला नव्या युगात घेऊन जाणार असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले. इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणं, हे ‘भारत...

January 3, 2025 2:16 PM January 3, 2025 2:16 PM

views 6

केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयच्या उप अधीक्षकासह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवालाच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दल गुन्हा

केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयच्या उप अधीक्षकासह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवालाच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज आणि अपहार शाखेचे अधीक्षक बी. एम. मीना यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला असल्याचं सीबीआयच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. हा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर जयपूर, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीत २० ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यामध्ये ५५ लाख रुपयांची रोख रक्कम, मालमत्तेची कागदपत्रं हस्तगत करण्यात ...

December 19, 2024 9:48 AM December 19, 2024 9:48 AM

views 5

भ्रष्टाचार प्रकरणी सीबायची मुंबईतल्या सात अधिकाऱ्यांवर कारवाई

केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सामुहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात २७ स्थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सांगितलं. सीप्झमधलं जागा आरक्षण, आयात मालाचं वितरण आणि अन्य गैरव्यवहारांसाठी मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. सह विकास आयुक्त, उप विकास आयुक्त आणि दोन सहायक विकास आयुक्तांचा यामध्ये समाव...

December 12, 2024 10:52 AM December 12, 2024 10:52 AM

views 15

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी – बजरंग सोनवणे

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. याविषयावर तातडीने ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं.

November 21, 2024 1:26 PM November 21, 2024 1:26 PM

views 8

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत सीबीआयची कारवाई

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं  बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महार...

September 30, 2024 1:20 PM September 30, 2024 1:20 PM

views 9

सीबीआयच्या कारवाईत देशभरातल्या २६ आरोपींना अटक

संघटित पद्धतीने केलेल्या सायबर गुन्ह्यासंदर्भात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने छापेमारी केली आहे. या कारवाईत देशभरातल्या २६ आरोपींना विविध शहरांतून अटक झाली आहे. यापैकी १० जणांना पुणे, ५ आरोपींना हैदराबाद तर ११ आरोपींना विशाखापट्टणममधून अटक झाली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या कॉल सेंटर्सचीही चौकशी सुरू असून आरोपींकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाईल, लॅपटॉप, आर्थिक तपशील यांच्यासह ९५१ वस्तू तसंच ५८ लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. सिस...

September 8, 2024 6:12 PM September 8, 2024 6:12 PM

views 6

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

September 8, 2024 2:17 PM September 8, 2024 2:17 PM

views 7

मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. अटक केलेल...

September 3, 2024 8:16 PM September 3, 2024 8:16 PM

views 7

नाशिक : कृषी आणि विपणन विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

केंद्र सरकारच्या कृषी आणि विपणन विभागाच्या नाशिक इथल्या कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना आज सीबीआयनं रंगेहाथ पकडलं. या अधिकाऱ्यानं एगमार्कचा परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली. विशाल तळवडकर असं या अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, न्यायालयानं त्याला ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.