May 11, 2025 8:11 PM May 11, 2025 8:11 PM

views 11

ऑपरेशन चक्र ५ अंतर्गत सीबीआयचे ४२ ठिकाणी छापे

डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन चक्र ५ अंतर्गत सीबीआयनं ८ राज्यांमधल्या ४२ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये ही छापेमारी झाली असून पाच जणांना अटक केली आहे. 

March 26, 2025 3:05 PM March 26, 2025 3:05 PM

views 14

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरांवर सीबीआयचे छापा

सहा हजार कोटी रुपयाच्या महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई इथल्या घरांवर आज सीबीआयने छापा टाकला. त्याखेरीज ४ आयपीएस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापा टाकला. बघेल यांच्या निकटवर्तियांच्या घरं आणि आस्थापनांवरही  झडती सत्र राबवण्यात आलं. छत्तीसगडच्या विविध शहरांमधे मिळून एकूण २० ठिकाणी सीबीआयने कारवाई केली. या बेकायदेशीर बेटिंग ऐपद्वारे मोठ्या प्रमाणावर बेनामी खाती उघडून काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप संबंधितांवर आहे. 

February 26, 2025 10:31 AM February 26, 2025 10:31 AM

views 12

क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी देशात CBIचे छापे

क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशभरातल्या ६०हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात पुणे, कोल्हापूर, नांदेड, दिल्ली, चंदिगड, बेंगळुरू शहरांचा समावेश आहे. गेन बिटकॉईन नावाच्या २०१५मध्ये सुरू झालेल्या कंपनीने १८ महिन्यांसाठी दरमहा १० टक्के दराने फायदेशीर परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. २०१७मध्ये या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता.

October 1, 2024 10:44 AM October 1, 2024 10:44 AM

views 10

सायबर गुन्हेगारीसंदर्भात सीबीआय चे देशभरात छापे, २६ जणांना अटक

जगभरातल्या लोकांची सायबर गुन्हेगारीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील असलेल्या २६ जणांना काल केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय नं अटक केली. देशभरातल्या विविध ३२ ठिकाणी छापे घालून सीबीआय नं सायबर गुन्हेगारीचं हे जाळं उद्धस्त केलं. या प्रकरणी पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांना हैदराबादमधून तर ११ जणांना विशाखापट्टणम इथून ताब्यात घेतलं. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाइल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम यासह अन्य साहित्य सीबीआय नं जप्त केलं. या गुन्हेगारांनी परदेशातल्या, प्रामुख्यानं अ...