September 16, 2025 1:38 PM September 16, 2025 1:38 PM
16
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०२५-२६ या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत प्रप्तिकरविवरण पत्र भरता येतील. यंदाच्या करनिर्धारण वर्षासाठी आतापर्यंत सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं कर विभागानं सांगितलं आहे.