May 15, 2025 7:40 PM May 15, 2025 7:40 PM

views 13

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, म्हणून सरकारनं जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा आणि कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात यामुळे मदत होईल. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते, असं ते म्हणाले.    कर्नल सोफिया या...

May 6, 2025 3:07 PM May 6, 2025 3:07 PM

views 8

जातनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीविषयी काँग्रेसच्या विविध सूचना

जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहीलं असून त्यात तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्रसरकारनं  पाहावं अशी सूचना केली आहे. आरक्षणावरची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, खासगी शिक्षण संस्थांमधे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गियांसाठी आरक्षण ठेवावं असे अनेक मुद्दे खरगे यांनी सुचवले आहेत.   दरम्यान, खरगे यांच्या ...

April 30, 2025 8:53 PM April 30, 2025 8:53 PM

views 11

जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असं त्यांनी म्हटलंय.    तर, केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली...